पोस्ट्स

भाग १ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - विषय प्रवेश -

इमेज
  गाभा:  https://misalpav.com/node/46204 भाग १ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - विषय प्रवेश शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारले. या लढ्यातील अफ़झलखानाच्या बाजूने लष्करी चालींच्या मांडणीतून त्याचे ध्येय धोरणावर, केलेल्या खेळींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न… इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो असे म्हणतात. जे हारतात त्यांची बाजू काय असेल? त्यांच्या हातून काही गफलत झाल्या त्यामुळे जिंकलेली बाजी हरायची वेळ आली? याचा ओहापोह करायला हवा असतो. तो केला जातोच असे नाही. शिवाय केला तर आपल्या चुका इतरांना कळून येऊ नयेत म्हणून असे *अहवाल दाबून ठेवले जातात. काही काळानंतर हार झालेल्या संग्रामातील मनुष्य, धन, वैभव, प्रतिष्ठा यांची हानी झाली तरी ती लढाई खरे तर आम्हीच जिंकली होती असे स्वतःची पाठ थोपटून म्हणण्याचा प्रघात पडतो. असो. इतिहासाच्या पानांवर बरेच काही लिहीलेले नसते. कारण तसे पुरावे अनुपलब्ध असतात. पण ते समजावून घेणारे डोळे आणि कान असतील तर छोट्या टिंबाना जोडून काही शोधता येईल का असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? शिवाजी महाराजांना सुपर मॅन बनवले जाऊ नये. कल्पकता, चातुर्य, साहस, मिळालेल्या नैसर्गि...

भाग २ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - अफ़झलखानाचा पुर्व परिचय -

इमेज
  गाभा:  https://misalpav.com/node/46210 प्रतापगडाची उलटवलेली बाजी - अफ़झलखानाचा पुर्व परिचय - भाग २ मुगल सत्तांतर मुगलांची सत्तास्पर्धा १६३६ साली मुगलांनी अहमदनगरची निजामशाही बुडवली. त्यांचा मुलुख आदिलशाहीशी वाटून घेतला. १६५६ साली आदिलशाही संपवण्यासाठी दिल्लीहून शहाजहान काही कारवाई करत होता. औरंगजेब तेंव्हा दख्खनचा सुभेदार होता. १६५७ सालापासून शहाजहान आजारी पडत असल्याने दिल्लीतील तख्तावर अधिकार मिळवायला ४ भावात वैर वाढून इतर राज्य कारवायांना दुय्यम स्थान दिले जाऊ लागले. भावांचा बंदोबस्त करून शहाजहानला आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात नजरकैदेत करून औरंगजेबाने दिल्लीतील लालकिल्यातून स्वतः बादशहा झाल्याचे फर्मान काढले. त्याच्या लेखी शिवाजी हा आदिलशाह विरुध्द बंड करणारा एक छोटा जमीनदार होता. आदिलशाहीतील कमकुवतपणा अदिलशाहीची व्याप्ती १६५६ साली मुहम्मद आदिलशाह वारला. त्याच्या कारकीर्दीत बांधलेल्या गोल घुमट (१६२७ ते १६५५) वास्तूत नंतर त्याची कबर बनवली गेली. त्याची बेगम साहेबा (गोवळकोंड्याच्या मुहंमद कुतुबशाहची मुलगी - मराठीत बडी साहेबीण म्हणायचा प्रघात आहे.) ने अलि आदिलशाह या कोवळ्या सावत...

भाग_३_प्रतापगडाची_उलटलेली_बाजी शिवाजीमहाराजांपुढील_आव्हाने_,_संध्या

इमेज
  गाभा:    https://misalpav.com/node/46224 शिवाजी महाराजांच्या पुढील परिस्थिती - आव्हाने आणि संध्या भाग ३ बंधू संभाजीची हत्या सन १६२८ पासून शाहजहान बऱ्हाणपुरहून, आग्र्याला व नंतर दिल्लीतून राज्य कारभार चालवत होता. शहाजीराजांचे सुटका करून देण्यासाठी सन १६४९ महाराजांनी किल्ले परत केले होते. शहाजीराजे बंगलोरला परतले. १६५३ साली महाराजांच्या मोठ्या भावाची - संभाजीची हत्या कर्नाटकात कनकगिरीला झाली. त्या हत्येत अफ़झलखानाचा हात होता. संभाजीराजेंनी कनकगिरी-हंपीच्या आसपासच्या वैभवपूर्ण वास्तू पाहून आपल्या राज्याची राजधानी करता येईल असा कयास बांधून अब्बाखान नामक तिथल्या किल्लेदाराला त्याच्या गचाळ आणि हिंदूंना छळणाऱ्याला कामगिरीमुळे काढून तिथे आपल्याकडील किल्लेदार नेमला. कागाळी आदिलशहाकडे गेली. त्याचा निवाडा करायला अफ़झलखानाला नेमले गेले. अफ़झलखानाला संभाजीराजेंनी पूर्वी बंगलोरच्या एका लढ्यात हुसकाऊन लावल्याचा राग होता. वरवर मदत करतो असे दाखवून अब्बाखानाच्या बाजूने त्याने आपले सैन्य अचानक उभे केले आणि संभाजीराजेंना दगा करून मारले. भावाला असे मारलेले महाराजांच्या जिव्हारी लागले. (बंग...

भाग ४ प्रतापगडाची उलटलेली बाजी -अफ़झलखान निघाला विजापुरहून …

इमेज
  गाभा:    https://misalpav.com/node/46232 अफ़झलखान निघाला विजापुरहून … भाग ४ विडा उचलला बडी साहेबीणनी अफ़झलखानाला विजापूरच्या राजवाड्यात खलबतखान्यात बोलावून घेतले. 'आम्ही तुमची शिवाच्या बंदोबस्ताच्या मोहिमेवर नेमणूक करत आहोत. आपल्याला कोण हवे ते सरदार, जनावरे, पैसा अडका, वगैरेवर विचार करून खर्चाचा अहवाल सादर करा. तो आम्ही मंजूर करू. बशर्ते सिवा जिंदा दरबारमधे घेऊन या. किंवा त्याची लाश आमच्या हवाले करा. कामाला लागा.' असा आदेश दिला.' मला सरदारांशी बोलून कारवाईचा आराखडा मंजूर करायला वेळ द्यावा.' त्या प्रमाणे सर्व तयारी झाल्यावर दरबारात अफ़झलखानानाने विडा उचलून मोहिमेची जबाबदारी स्वीकारली. सैनिकी आवेशात,' हे काम मला दिलेत म्हणजे फत्ते झाले आहे असे समजा' असे हात वर करून आश्वासन दिले. अफ़झलखानाची स्वतःची सेना मे शेवटच्या आठवड्यात म्हणजे सन १६५९ च्या तारीख २५ सुमारास विजापूरहून निघायला  * ८ किमी दूर तोरवीला सज्ज झाली. नंतर जागोजागी किल्लेदार, सरदार आणि त्यांच्या सैन्याला समावेत घेत विजापूरहून (विजयापुरा)निघाली. जेंव्हा निघाली तेंव्हा ती  ** १० हजार घोडदळ होते व त्या स...

भाग ५ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - सुस्त अजगरनीती

इमेज
  गाभा:  सुस्त अजगरनीती भाग ५ शान आणि वैभवाचे प्रतीक, वेळोवेळी बोजड सामान घेऊन जाणार्‍या हत्तींनी पावसाळ्याचा मौसम, नदीच्या पाण्यात डुंबायचा मस्तीचा शौख़ पुरा करून घेत होते. हत्तिणींशी संग करायला हत्ती चेकाळत होते. त्यांना लांब ठेवायला माहूतांची तारांबळ होत होती. उंटांचे तांडे, गाई - बैल पावसाळ्यात आडोशाने रवंथ करत संथ होते. जंगली जनावरे फेकलेले उष्टे अन्न खायच्या नादाने तळाजवळ सारखे भिरभिरत असत. त्यांना मारून पुलाव्यात त्यांचे शिजलेले तुकडे घालून खायला अनेकांची मेजवानी होई. नालबंद कारागीर घोड्याच्या खुरांना नवे नाल मारून आपली कमाई करत होते. लोहारांच्या भट्ट्यात भर पावसात पेटवल्या जाऊन नवे नाल, खिळे बनत राहिले. मुस्लिम सरदारांच्या दाढ्यांना आकर्षण रंगीत करून मिशा साफ करणे यावर नाई लोकांना उसंत मिळेना! तलवारींच्या ढिल्या मुठी, बाजूबंद दुरुस्त करून घेणे, आपापल्या शस्त्रांना धार लावायला नोकर वर्गांना जारीने कामाला लावले गेले. मराठ्यांच्या चपळ आणि जंगलातून साहसी कारवाया करणाऱ्या सैनिकांना शह देण्यासाठी सुस्त, बेशिस्त, घनदाट अरण्यात गांगरुन जाणाऱ्या कुचकामी नोकरांना, सरदारांच्या जन...

भाग ६ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - जावळीतील सैन्य व्यूह

इमेज
  गाभा:  भाग ६ जावळीतील सैन्य व्यूह जावळी नुसते एक गाव नसून त्या काळात विस्ताराने, लोकसंख्येने व मानाने मोठे संस्थान होते. भावाभावात ८ ठिकाणात वाटलेले असले तरी आदिलशाहीशी ईमान राखून होते. (चंद्रराव पदावर) येसाजी मोरे जावळीचा संस्थानिक होता. त्याचे महाराजांशी संबंध जाने १६५६ पर्यंत बरे होते. आदिलशाहीतील गादीच्या वर्चस्वासाठी गोंधळाच्या परिस्थितीचा विचार करून जावळी आपल्याकडे करून घेण्यासाठी महाराजांनी मोहीम उघडली. त्या काळात मोरेच्या बाजूने महाराजांच्या सैन्यावर छुपे हल्ले होत होते. पुरंदरहून महाराज १० हजार सैन्यास घेऊन निघाले. सेनेचे दोन तुकडे करून घोडदळाची मोठी फौज रडतोंडी घाटातून जावळीत घातली. लहान पायदळाची तुकडी महाराजांच्या नेतृत्वाखाली म'श्वर मार्गे निसणीच्या अतीशय तीव्र उताराच्या घाटमार्गातून जावळी गावात घुसली. चकित झालेला चंद्रराव फारसा प्रतिकार न होता रायरीला पळाला. महाराजांनी जावळीचा कोट मिळवला. पण महाराजांच्या सैन्यावर चंद्ररावाकडून हल्ले करून हैराण करायची खेळी केली गेली. मात्र शेवटी महाराजांनी त्याचा बंदोबस्त केला. त्यानंतर साधारण (३ महिने ६ एप्रिल १६५६) महाराजांनी त...

भाग ७ प्रतापगडावरची उलटवलेली बाजी...पळापळ_आणि_भराऱ्या

इमेज
  गाभा:  भाग  ७ प्रतापगडावरची उलटवलेली बाजी...पळापळ_आणि_भराऱ्या भाग ७ अनपेक्षित परिणाम आणि पळापळ महाराजांनी अफजलखानाला कसे मारले? याची बातमी कळायला वेळ लागला. ठरवल्याप्रमाणे शिंगे फुंकली गेली. पण नंतर तोफांचे बार निघायला लागले तेंव्हा आपल्या १५शे निवडकांनी प्रतापगडावर चाल करून वर जाऊन तोफा वाजवल्या का सिवाने आपल्या सैन्याला इशारा देऊन आपल्या सैन्यावर तुटून पडायला त्यांचे आधीच ठरलेले होते वगैरे प्रश्नांची उत्तरे संभ्रमित होती. अफ़झलखानाच्या पश्चात वरिष्ठ म्हणून मुसाखानावर जबाबदारी पडली. एकानी बातमी आणली की अफ़झलखानाची हत्या करून त्याचे मुंडके तोडले आहे. ते ऐकून चकित झालेल्या मूसाखानाने परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्याकडील सरदारांना निरोप दिला की शक्यतो जावळीच्या कोटाकडे मागे फिरा. त्याने प्रतापराव मोरेला पकडून समोर उभे केले आणि परिस्थितीची अगतिकता, क्रोध येऊन तो अद्वातद्वा झाला. 'तू याला जबाबदार आहेस' म्हणून लाथाडले. १५शे हशमांपैकी काही थोडे जखमी होऊन परतले तेंव्हा त्यांनी सांगितले की सिवाच्या लोकांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. आम्ही चिंचोळ्या रस्त्यात अडकून पडलो. काही झाडावर...